Thu, May 23, 2019 05:07होमपेज › Sangli › ममता लॉजवर वेश्या व्यवसाय

ममता लॉजवर वेश्या व्यवसाय

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: Jun 01 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

येथील बसस्थानकाजवळील ममता लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिस कारवाईत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी लॉजचा मालक संदेश वसंत कल्याणकर(वय 42, रा. हरिपूर रस्ता, सांगली) याच्यासह 72 वर्षांचा एजंट भूपाल भुजाप्पा मगदूम (रा. सीतारामनगर) यांना अटक केली आहे. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : ममता लॉजवर वेश्या व्यवसाय चालतो.  त्यासाठी या लॉजवर मुलींना ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके यांच्या पथकाने या लॉजच्या परिसरात पाळत ठेवली. बनावट ग्राहक तयार करून त्याला लॉजमध्ये पाठवण्यात आले. त्यावेळी लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याचे आणि लॉजमध्ये मुलींना ठेवण्यात आल्याचे स्पष्ठ झाले. 

त्यामुळे पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. त्या ठिकाणी असलेल्या एका महिलेची सुटका केली. या प्रकरणी लॉजमालक कल्याणकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मगदूम लॉजमध्ये ग्राहक पुरवतो. त्यासाठी लॉज मालकाकडून कमिशन घेतो अशी माहिती   पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी भूपाल मगदूम यालाही ताब्यात घेऊन अटक केली.  पोलिस उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर, भगवान नाडगे, विकास पाटणकर, लता गावडे, अभिजीत गायकवाड, स्नेहल मोरे या  कारवाईत सहभागी झाले होते.