Fri, Sep 21, 2018 11:31होमपेज › Sangli › अहिल्यादेवींच्या ‘राज्य विकास’ पॅटर्नद्वारेच समृध्दी 

अहिल्यादेवींच्या ‘राज्य विकास’ पॅटर्नद्वारेच समृध्दी 

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 10:03PMसांगली : प्रतिनिधी

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राबविलेला राज्य विकास पॅटर्न देश आणि राज्याच्या समृद्धीचा महामार्ग आहे. तोच आदर्श राज्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी राबविणे गरजेचे आहे, असे मत खासदार संजय पाटील यांनी व्यक्‍त केले. गुरुवारी स्टेशन चौकात जयंती महोत्सव समितीच्यावतीने चारदिवसीय ‘अहिल्या महोत्सवा’चा त्यांच्याहस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, कुशल प्रशासक व संघटक असलेल्या अहिल्यादेवी आदर्शवत राजमाता म्हणून देश- विदेशात प्रसिध्द आहेत. त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांसह अनेक हिंदू मंदिरे व नदीघाटांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या शहरांना अतिसुंदर बनविले. होळकर साम्राज्य हे रयतेचे असून आपण केवळ कर्ते आहोत, या हेतूनेच त्या न्यायाने कारभार करायच्या. त्यांचे कार्य संपूर्ण जगाला दिशा दाखविणारे आहे. महोत्सव समितीचे अध्यक्ष आनंदराव पारगावकर म्हणाले, संपूर्ण होळकरशाहीचे दर्शन घडविणारे चित्रदालन हे जयंती महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

महिला आघाडी अध्यक्षा सौ. कल्पना कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक सुभाष गोयकर, अमर पडळकर, विक्रम  वाघमोडे, हरिदास लेंगरे, शहाजी कोकरे, रामभाऊ मासाळ, डॉ. रामदास हजारे, प्रा. आर. एस. चोपडे, तात्यासाहेब गडदे, विनायक रुपनर, भारत खांडेकर, अभिजित तुराई, महेश पाटील, अमित पारेकर, सौ. प्रियदर्शिनी वाघमोडे, राजाक्का गडदे, लक्ष्मी कोकरे आदी उपस्थित होते.ल