Sun, Feb 17, 2019 09:00होमपेज › Sangli › संशयितांनी वकील न दिल्याने सुनावणी लांबणीवर : अ‍ॅड. निकम

संशयितांनी वकील न दिल्याने सुनावणी लांबणीवर : अ‍ॅड. निकम

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:32AMसांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणाची गुरुवारी पहिल्यांदाच माहिती घेतली आहे. या याप्रकरणी अजून संशयितांनी वकील दिलेले नाहीत. ते दिल्यानंतर यावर लवकरच सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

अ‍ॅड. निकम गुरुवारी सांगलीत आले होते. यावेळी सीआयडी (राज्य गुन्हे अन्वेषण) कडून न्यायालयात दाखल केलेले आरोपपत्र, नोंदवलेले जबाब आदींची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळेचा 6 नोव्हेंबर 2017 रोजी मारहाण करून पोलिसांनी खून केला. त्यानंतर कावळेसाद (आंबोली) येथे नेऊन त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्याचा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, चालक राहुल शिंगटे, झीरो पोलिस झाकीर पट्टेवाले, कामटेचा मामे सासरा बाळासाहेब कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या खूनप्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. याप्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या कळंबा (जि. कोल्हापूर) येथील मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सीआयडीने तपास करुन दि. 5 फेबु्रवारीला न्यायालयात सुमारे 700 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

मार्चमध्ये यावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. त्यावर सुनावणी सुरु आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. निकम यांची शासनाने नियुक्ती केली आहे. गुरुवारी हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीसाठी अ‍ॅड. निकम हे सांगलीत आले होते. 

Tags : sangli, sangli news, Prosecution of the suspects,attorney pending,  Adv. Nikam,