Tue, Jul 23, 2019 02:30होमपेज › Sangli › भाजपच्या पराभवासाठी पुरोगामी विचार आघाडी 

भाजपच्या पराभवासाठी पुरोगामी विचार आघाडी 

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 14 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत इव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅट देण्यात यावे, यासाठी जनआंदोलन हाती घेण्याचा निर्णय लोकशाही संवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच फॅसिस्ट विचारांच्या भाजपला पराभूत करण्यासाठी पुरोगामी विचारांच्या 13 पक्षांची बैठक रविवारी (दि. 17) घेण्यात येणार आहे. येथील कष्टकर्‍यांची दौलत सभागृहात शहरातील पुरोगामी संघटनांची बैठक झाली. डॉ. बाबुराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, बापूसाहेब मगदूम, विकास मगदूम, कॉ. उमेश देशमुख, डॉ. अमर पांडे, डॉ. विनोद पवार, डॉ. अमोल पवार, मुनीर मुल्ला, महेश माने, राजू कांबळे आदिसह विविध पुरोगामी पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

ईव्हीएम मशीनबद्दल जनतेमध्ये तसेच अनेक पक्षांची शंका आहे. त्यामुळे  या मशीनबरोबर व्हीव्हीपॅट देण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु महापालिकेच्या निवडणुकीत ती दिली जाणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा हा  प्रयत्न आहे. याविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांची आघाडी करून प्रत्येक जागेवर उमेदवार उभा करण्याचे ठरले.