Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Sangli › पोलिसच खून करायला लागले तर न्याय कसा मिळेल?

पोलिसच खून करायला लागले तर न्याय कसा मिळेल?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

आरगपासून चार किलोमीटर अंतरावरील गायकवाड चव्हाण मळा जिल्हा परिषद शाळेत बुधवारी मुक्त संवाद हा उपक्रम झाला. सिम्बॉयसिस लॉ कॉलेजचे प्राध्यापक अ‍ॅड. आशिष देशपांडे यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. 

पोलिसच खून करायला लागले तर न्याय कसा मिळेल, असे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारले. अ‍ॅड.  देशपांडे यांनी बुधवारी या प्राथमिक शाळेला भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी मुक्त संवाद साधला. 

सांगलीत अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीतील मृत्यू आणि नंतर जाळून पुरावा नष्ट करण्याचा झालेला प्रकार अजून ताजा आहे. विद्यार्थ्यांनी संवाद साधताना हा विषय आला. पोलिसच खून करायला लागले तर न्याय कसा मिळेल, असा प्रश्‍न एका विद्यार्थ्याने विचारला. 

लोकांच्या तक्रारींची पोलिसांनी दखल न घेतल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावता येऊ शकते,असे अ‍ॅड. देशपाडे यांनी सांगितले. न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे, साक्षी, पुरावे याच्या आधारे कोण खरेे कोण खोटे हे न्यायाधीश ठरवतात, असेही त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. 

वकील काळा कोट का घालतात, या प्रश्‍नावर अ‍ॅड. देशपांडे म्हणाले, भारतात ब्रिटीशांची सत्ता आल्यानंतर इंग्रजांनी तिकडील व्यवस्था देशात आणली. तिकडे थंडी अधिक असते. थंडीपासून संरक्षण म्हणून कोट घालण्याची पद्धत आहे. काळा रंग उष्णताशोषक आहे. अ‍ॅड. देशपांडे यांनी शिक्षक अमोल शिंदे, पोपट निकम यांचे अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण, आनंदा चव्हाण उपस्थित होते.