होमपेज › Sangli › प्राथमिक शिक्षकांचे अधिवेशन गोव्यात

प्राथमिक शिक्षकांचे अधिवेशन गोव्यात

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 19 2017 10:34PM

बुकमार्क करा

सांगली  प्रतिनिधी

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे गोवा येथे त्रैवार्षिक अधिवेशन घेतले जाणार आहे. शिक्षक  संघाचे शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. गोवा अधिवेशनासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी ते सांगलीत येणार आहेत. 

प्राथमिक शिक्षक संघात शिवाजीराव पाटील गट व संभाजीराव थोरात गट असे दोन गट कार्यरत होते. या दोन गटांना एकत्र आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मनोमिलन होऊन पुन्हा मतभेद होत राहिले. अगोदर महामंडळ सभा की अधिवेशन यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये नुकताच मनोभंग झाला होता. येलूर येथील महामंडळ सभेवर थोरात गटाने बहिष्कार टाकला होता.

दरम्यान, गोवा अधिवेशन निश्‍चित झाले आहे. पाटील व थोरात हे दोन्ही नेते परत एकत्र आले आहेत. अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्यावतीने गोवा येथे त्रैवार्षिक अधिवेशन घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या अधिवेशनास आणण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.