Wed, Apr 24, 2019 11:48होमपेज › Sangli › जिल्ह्यातील 250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

जिल्ह्यातील 250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Published On: Jun 29 2018 12:01AM | Last Updated: Jun 28 2018 11:48PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर  जिल्हा पोलिस दलाने बुधवारी ऑपरेशन ‘ऑल आऊट’ मोहीम राबविली. प्रलंबित समन्स, वॉरंट आदीची माहिती संकलित करून 250 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगार चांगलेच हादरले आहेत.   महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. इच्छुकांत काही गुन्हेगारांचाही समावेश आहे. निवडणुकीत साम, दाम, दंड आदी सर्व पद्धतींचा वापर होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. 

पाच टोळ्यांतील 40 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यातच गुरुवारी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकार्‍यांनी ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिम राबवली.  जिल्ह्यातील रेकॉर्डवरील, फरारी आरोपींवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.  एकूण 28 ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली होती. त्यात 41 पोलिस अधिकारी 307 कर्मचार्‍यांचा समावेश होता. गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयात हजर राहण्याबाबत 69 समन्स न्यायालयाने बजावले आहेत. त्यांच्यावरही एकाचवेळी कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली. सराईत तिघांना अटक करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या 11 हॉटेल्स आणि पानटपर्‍यांवर कारवाई करण्यात आली.  अनेक दिवसांपासून फरार असलेल्या 9 जणांना अटक करण्यात आली. ड्रंक अँड ड्राईव्हची 52 जणांवर करवाई करण्यात आली. 

पन्‍नास हजार रुपयांचा दंड वसूल

विनापरवाना वाहन चालवणे, सेफ्टी बेल्ट न लावणे,  बेकायदा प्रवासी वाहतूक करणे, ट्रिपल सिट दुचाकी चालवणे आदी प्रकरणांत एका दिवसात सुमारे पन्‍नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका क्षेत्रात यापुढेही अचानक अशी मोहीम राबवण्यात येणार आहे.