Tue, Apr 23, 2019 20:22



होमपेज › Sangli › पोलिसांवर होणारे हल्ले रोखा

पोलिसांवर होणारे हल्ले रोखा

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:31PM



सांगली : प्रतिनिधी

वाहतूक  पोलिस समाधान मांटे खूनप्रकरणी आज सांगली पोलिसांचे कुटुंबीय आणि निवृत्त पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांवरील हल्ले रोखावेत, अशी मागणी केली.पोलिस मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक गिड्डे यांना शिष्टमंडळ भेटले. त्यांनी निवेदनही दिले.दरम्यान, या घटनेत मृत पावलेल्या मांटे  यांच्या कुटुंबियांना सरकारने लवकर आर्थिक मदत द्यावी,  अशीही मागणी करण्यात आली. निवृत्त पोलिस कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांचे कुटुंबीय यावेळी  उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहेः   पोलिसांवर हल्ले होत आहेत, ही चिंताजनक गोष्ट आहे.  सांगलीमध्ये आता पोलिसाचा खून झाला आहे. याबाबत शासनाने गंभीर दाखल घ्यावी. या  खून प्रकरणाच्या खटल्याचा निकाल लवकर लागावा.  आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या खूनप्रकरणी सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा. जलदगती न्यायालयात खटला चालवावा. दोषींना कठोर शिक्षा कऱण्यात यावी. मांटे यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली.