Sun, Oct 20, 2019 12:22होमपेज › Sangli › प्रकाश आंबेडकर यांनी ब्रह्मनाळ गाव घेतले दत्तक

प्रकाश आंबेडकर यांनी ब्रह्मनाळ गाव घेतले दत्तक

Published On: Aug 14 2019 11:24PM | Last Updated: Aug 14 2019 10:43PM
भिलवडी : प्रतिनिधी

महापुराचा सर्वाधिक तडाखा  बसलेले ब्रह्मनाळ (ता. पलूस) हे गाव  वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर  यांनी दत्तक घेतले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने त्यांच्याशी  पत्रव्यवहार केला होता.  या गावात महापुराच्या वेळी बोट उलटून आठ जणांचा मृत्यू झाला होता.

ग्रामपंचायतीच्या प्रस्तावानुसार गावात स्वच्छता, औषध फवारणी व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. गावातील सातशे कुटुंबांना एक महिना पुरेल इतका धान्यपुरवठा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य पुरवले जाणार आहे. वॉटर एटीएम उभारण्याचेही प्रस्तावित आहे.  शासनाकडून मदत देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच गावकर्‍यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी वर्षभर  विविध  कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.