Mon, Jun 17, 2019 15:15होमपेज › Sangli › फेसबुकवर अश्‍लील पोस्ट, वाळव्यातील एकाला अटक

फेसबुकवर अश्‍लील पोस्ट, वाळव्यातील एकाला अटक

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:05AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

फेसबुकवर महिलेच्या नावे बोगस खाते उघडून त्यावर अश्‍लील पोस्ट व  महिलेचा मोबाईल नंबर अ‍ॅड केल्या प्रकरणी एकाला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली. नितीन राजाराम थोरात (वय 28, रा. वाळवा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 

नितीन याने महिलेच्या नावे बोगस फेसबुक खाते उघडले होते. नितीनने त्यावर अश्‍लील पोस्ट टाकल्या होत्या. पीडित  महिलेचा  मोबाईल नंबर टाकला होता. पोस्ट पाहून त्या महिलेला कॉल येवू लागले. एक अनोळखी कॉल त्या महिलेला आला. तुम्ही मला फोन का करता, असे पीडित महिलेने विचारले. फोनवरील त्या व्यक्तीने एका फेसबुक वर तुमचा मोबाईल नंबर व अश्‍लील पोस्ट असल्याचे सांगितले. त्या महिलेने त्या अनोळखी व्यक्तीकडून अश्‍लील पोस्ट व्हॉटसअ‍ॅपवर मागवून घेतल्या. पोस्ट बघितल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी पीडित महिलेने इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी सायबर क्राईम ब्रँचने फेसबुक कंपनीकडे पत्रव्यवहार केला. संबंधित खाते कोण चालवते याबाबत माहिती मागवली. मात्र फेसबुक कंपनीने खाते चालवत असलेला व्यक्‍तीचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला. पोलिसांनी  मोबाईल  नंबरचा तपास केला असता तो नितीन थोरात याचा असल्याचे निष्पन्न  झाले.

Tags : sangli, facebook,  Porn post, one arrested, sangli news,