Mon, Aug 19, 2019 15:27होमपेज › Sangli › शिराळा तालुक्‍यात चुरशीने मतदान 

शिराळा तालुक्‍यात चुरशीने मतदान 

Published On: Apr 23 2019 5:33PM | Last Updated: Apr 23 2019 5:33PM
शिराळा : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी शिराळा विधानसभा मतदारसंघातील ३३४ मतदान केंद्रावर चुरशीने  व शांततेत मतदान झाले. 

सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले मात्र मतदानाचा वेग सकाळी फारच कमी होता, तो सात ते नऊ वाजता ७.२९ टक्के होता. आकरा वाजल्या नंतर मतदानाचा थोडा वेग वाढला. तो २१.३३ टक्के झाला. त्यानंतर भर उन्हात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. 

 मतदान केंद्रावर हजेरी लावल्‍यांना प्रथमच दिव्यांसाठी फुले देऊन व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाळणाघराची व्यवस्था,  देखरेखीसाठी अंगणवाडी सेविका ठेवण्यात आल्या होत्या. पाडळेवाडी येथे मतदान केंद्रावर सर्व कर्मचारी महिला होत्या. मेडिकल कीट ठेवण्यात आले होते. निर्भय पणे मतदारांनी मतदान करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद व तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले. 

शिराळा येथील बुथ २११ व बिऊर येथील २३४  बुथवर काही काळ मशीन बंद होत्या तर बिऊर येथे मतदानाचे मशीन काही काळ बंद होते. किरकोळ दुरुस्ती नंतर सुरू झाली. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यात मज्जाव केला, त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादी  झाली. शिराळा विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी २००४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी यांची टीम करण्यात आली होती. 

३१ झोन करण्यात आले आहेत. त्यासाठी ३१ झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी नेण्या- आणण्यासाठी ५२ एसटी व १७ चारचाकी गाड्या करण्यात आल्या आहेत.पाच फिरती पथके आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदार संघात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी चिखली येथे मतदान केले. तर सत्यजित देशमुख यांनी कोकरूड येथे मतदान केले.लोकसभेच्या मतदानाचासाठी मुंबईहून मतदार आले होते.

शिराळा विधानसभा मतदार संघात शिराळा तालुक्यातील ९५  गांवात १७६  मतदान केंद्रे असून मतदार १ लाख ४२ हजार २९९ तर वाळवा तालुक्यातील ४८  गावात १५८ मतदान केंद्रे आहेत. सर्व मतदान केंद्रावर चुरशीने मतदान होत आहे.