Tue, Jul 23, 2019 16:41होमपेज › Sangli › शिराळा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान

शिराळा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 12:30AMऐतवडे बुद्रूक : सुनील पाटील

शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सर्वच राजकीय नेते व पक्ष संभाव्य राजकीय  संघर्षासाठी सिद्ध झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून  या  मतदारसंघात शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक  असे  आमदारकीवर दावा सांगणारे तीन प्रबळ गट कार्यरत आहेत.  त्यापैकी दोन गट एकाच झेंड्याखाली येतील त्यांचा  अनेकदा विजय निश्‍चित होतो, असा आजवरचा अनुभव आहे. 

सन 1995 मध्ये देशमुख हे  प्रदेश काँगे्रसचे अध्यक्ष होते.भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु त्यावेळीत्यांचे विश्‍वासू सहकारी व तत्कालीन सांगली जिल्हा परिषदेचेे अध्यक्ष शिवाजीराव नाईक यांना   काँगे्रस पक्षाची उमेदवारी मिळू शकली नाही. त्याऐवजी देशमुख  यांचे निकटचे सहकारी शंकरराव चरापले यांना उमेदवारी मिळाली. 

त्यांच्याविरोधात नाराज झालेले शिवाजीराव नाईक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दंड थोपटले. त्यांना लोकनेते  (कै.) फत्तेसिंग नाईक व राजारामबापू उद्योग समुहाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी उघडपणे मदत केली.  निवडून आणले. परंतु त्यावेळी राज्यात भाजप सेनेची सत्ता स्थापन झाली व देशमुखांना मोठा फटका बसला. 

शिवाजीराव नाईक यांनी युतीला पाठिंबा दिला. त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. काही कालावधीत वाकुर्डे बुद्रूक योजना, डावा कालवा व वाळवा तालुक्यातील 28 गावांवरील वर्चस्वावरून वादाला सुरूवात झाली. नंतरच्या सन 1999 ला सत्यजित देशमुख यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली. याच दरम्यान शिवाजीराव नाईक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात प्रवेश केला. उमेदवारी मिळविली. विश्‍वास उद्योग समुह व नेेते राष्ट्रवादीबरोबर राहिले. जयंत पाटील यांच्या  28 गावांतील नेते व कार्यकर्त्यांनी सत्यजित देशमुख यांना शिराळ्यात पाठिंबा दिला. अटीतटीच्या लढतीत पुन्हा शिवाजीराव नाईक निवडून आले. राष्ट्रवादी व काँग्रेसचे आघाडी सरकार स्थापन झाले व जयंत पाटील कॅबिनेटमंत्री झाले. एकूणच शिवाजीराव  नाईक यांना शह बसण्यास सुरूवात झाली. 

सन 2004 मध्ये पुन्हा तिरंगी लढत झाली. सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक दोघांचा पराभव करून शिवाजीराव नाईक तिसर्‍यांदा निवडून आले. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले. परंतु त्यांना वरिष्ठ पातळीवर कोणाचाही आशीर्वाद न मिळाल्याने ताकद कमी पडत होती.  सन 2009 च्या निवडणुकीत सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार व विश्‍वास उद्योग समुहाचे नेते मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा दिला. काँगे्रसचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांचा मोठा पराभव केला. यामध्ये जयंत पाटील गटही आघाडीवर होता. 

मानसिंगराव नाईक यांनी आमदारपद व विश्‍वास उद्योग समुह या माध्यमातून पाच वर्षात मतदारसंघात मोठी विकासकामे केली. मात्र सन 2014 मध्ये तिरंगी लढत झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार म्हणून शिवाजीराव नाईक पुन्हा निवडून आले. भाजप सेनेचे सरकार स्थापन झाले. पण त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. सध्या  मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख एकत्र येऊन त्यांना शह देण्याच्या प्रयत्नात आहेत. 

महाडिक युवा शक्तीचे नेते सम्राट महाडिक यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. तर या सर्वांपासून दूर असलेले माजी जि.प. सदस्य शिवसेना नेते अभिजीत पाटील हे देखील लढत देणार  अशी  चर्चा आहे. 

 

Tags : sangli, sangli news, Shirala,  Political, Shirala assembly constituency,