Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Sangli › पाळीव कुत्र्यांना आता वार्षिक 5 हजार रु. शुल्क

पाळीव कुत्र्यांना आता वार्षिक 5 हजार रु. शुल्क

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 13 2018 11:00PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील पाळीव कुत्र्यांना आता महापालिकेकडून 5 हजार रुपये वार्षिक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यासाठी 20 एप्रिलरोजी होणार्‍या महासभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यासोबतच काही जागा भाड्याने देण्याचे प्रस्ताव आहेत. येथील महापालिकेसमोरील शाळा क्र. 10 जवळ शहरातील बचतगटांच्या उत्पादित मालास प्रदर्शन व विक्रीसाठी जागा देण्याचा प्रस्तावही आहे. यासह अनेक विषयांवरून महासभा गाजण्याची चिन्हे आहेत.  

शहरात हजारो कुत्री आहेत. त्यातील काही मोकाट तर काही पाळीव आहेत. यातील काही पाळीव कुत्रीही नागरिक परिसरात मोकाट सोडतात. मोकाट तसेच पाळीव कुत्रीही मोठ्या प्रमाणात नागरिकांवर हल्ले करतात. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्यापासून ते त्यांच्या स्वच्छतेचे प्रश्‍न निर्माण होतात. याचा नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

यावर उपाय म्हणून महापालिकेने पाळीव कुत्र्यांची नोंदणी करण्याची सक्‍ती केली होती. यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. आता या कुत्र्यांची नोंद आणि मालकांची जबाबदारी निश्‍चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता प्रशासनाने नोंदणीसोबतच 5 हजार रुपये वार्षिक शुल्क आकारणीचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने मालकांना श्‍वानाच्या खबरदारीचीही जाणीव होईल हा यामागचा हेतू आहे. शहरात सुमारे 20-25 हजाराहून अधिक संख्येने पाळीव कुत्री आहेत. यामुळे किमान 12 ते 25 लाख रुपये उत्पन्न मिळू शकेल. 

शहरातील बचतगटांच्या उत्पादनांना नियमित बाजारपेठ मिळावी, यासाठीही जागा मागणीचा प्रस्ताव आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत यासाठी प्रदर्शन आणि विक्रीसाठी येथील राजमती नेमगोंडा पाटील विद्यामंदिर (शाळा क्र. 10) च्या पश्‍चिम-दक्षिणेची बाजू देण्याचा प्रस्ताव आहे. यासह विविध विषयांमुळे सभा गाजणार आहे.

Tags :