Sun, Apr 21, 2019 14:06होमपेज › Sangli › शिपाई पदोन्नती फाईलसाठी सीईओंनी दिली ३ दिवसांची मुदत

शिपाई पदोन्नती फाईलसाठी सीईओंनी दिली ३ दिवसांची मुदत

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:29AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शिपाई पदोन्नतीची फाईल तीन दिवसात (दि. 15 डिसेंबरपर्यंत) सादर करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. लिपिकांना कालबद्ध पदोन्नती लाभाच्या फाईल दि. 20 डिसेंबरपर्यंत सादर करण्याच्या सुचानाही दिल्या. 

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर बाबर, राज्य उपाध्यक्षा स्वप्नाली माने, विशाल पाटील, कार्याध्यक्ष शरद कदम, बी. एस. पाटील, अरूणा कोले, अनिता पाटील, सुधीर मोरे,  प्रशांत बुचडे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षा उज्ज्वला हिप्परकर, धनंजय पाटील व संघटना पदाधिकार्‍यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांची भेट घेतली. मागण्यांचे निवेदन सादर केले.  सामान्य प्रशासन विभागाकडील 28 शिपायांची पदोन्नती रखडली आहे. हा प्रश्‍न संघटनेने प्रकर्षाने उपस्थित केला. दि. 15 डिसेंबरपर्यंत शिपाईंची कनिष्ठ लिपिकपदी पदोन्नतीसंदर्भातील फाईल सादर करण्याची सुचना राऊत यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिली. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती होणार असल्याचे समजते.

लिपिकांना बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवेनंतरच्या कालबद्ध पदोन्नती लाभासंदर्भातील फाईल दि. 20 डिसेंबरअखेर सादर करा, अशाही सुचना राऊत यांनी दिल्या आहेत. कक्षअधिकारी पदोन्नतीची तात्काळ कार्यवाही करावी, जिल्हा परिषद स्वीय निधीतून गुणवंत लिपिक पुरस्कार सुरू करावी,  प्रलंबित वैद्यकीय देयकांची प्रकरणे मंजूर करावीत, बीडीएस प्रणालीत चुक झाल्यास 1 हजार रुपये दंड आहे तो कमी करावा, क्रीडा स्पर्धा पूर्ववत सुरू कराव्यात आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.