Tue, May 21, 2019 00:39होमपेज › Sangli › शिपाई, लिपिकच्या १९ जागांसाठी चौदाशेंची ‘परीक्षा’

शिपाई, लिपिकच्या १९ जागांसाठी चौदाशेंची ‘परीक्षा’

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:22PMसांगली : प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडील शिपाई, रखवालदार, लिपिक, टायपिस्ट आदी पदांच्या 19 जागांवर भरतीसाठी तब्बल 1 हजार 400 उमेदवारांचे अर्ज आले आहेत.एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरने चक्क शिपाई पदासाठीही उमेदवारी अर्ज केला आहे.  दरम्यान, उमेदवारी अर्जांची छाननी व लेखी परीक्षेच्या दिनाकांकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. 

कनिष्ठ लिपिक, टायपिस्ट, संगणक चालक, सेस लिपीकच्या 10 जागांवर भरती होणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमाती 2, विमुक्त जाती अ 1, भटक्या जमाती ड 1, ओबीसी 2, विशेष मागास प्रवर्ग 1 जागा आरक्षित आहे. शिपाई, रखवालदार पदाच्या 9 जागांमध्ये अनुसूचित जमातीसाठी 3, विमुक्त जाती अ- 1, भटक्या जमाती ब- 1, भटक्या जमाती ड- 1, ओबीसी 1, समांतर आरक्षण 1, अपंगासाठी 1 जागा आरक्षित आहे. 

एका दिवसात 500 अर्ज

बाजार समितीकडील 19 जागांवर नोकरभरतीसाठी अर्ज करण्यास सोमवारी अंतिम दिवस होता. शनिवारी 900 अर्ज आले होते. सोमवारी एका दिवसात 500 अर्ज आले आहेत. एकूण 19 जागांवर भरतीसाठी 1 हजार 400 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. आता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. 

..तर आणखी उड्या पडल्या असत्या !

बाजार समितीने नोकरभरतीसाठी अर्ज मागविलेली सर्व 19 पदे आरक्षित आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकही पद नाही एन. टी. (क) या प्रवर्गासाठीही एकही पद आरक्षित नाही. खुल्या आणि एन. टी. (क) प्रवर्गासाठी जागा असत्या तर उमेदवारी अर्ज यापेक्षाही दुपटीहून अधिक संख्येने आले असते.