Sat, Jun 06, 2020 18:53होमपेज › Sangli › पवार गटाचा तातडीने अहवाल देणार 

पवार गटाचा तातडीने अहवाल देणार 

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 10:30PMसांगली : प्रतिनिधी

शिवसेनेतर्फे महापालिका निवडणूक एकसंघ  लढण्यासाठी   पवार गटाची आम्ही अंतिम क्षणापर्यंत वाट  पाहिली. मात्र, ते न आल्याने आम्ही   51  ठिकाणी सक्षम उमेदवार उभे केले आहेत.  पवार गटाने घेतलेल्या या भूमिकेबाबत पक्षश्रेष्ठींकडे तातडीने अहवाल पाठवून देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी   पत्रकार परिषदेत दिली. नगरसेवक शेखर माने, जिल्हा प्रमुख संजय विभुते , आनंदराव पवार उपस्थित होते. 

बानुगडे पाटील म्हणाले, सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. एकत्र निवडणूक लढविण्यासाठी आम्ही पवार गटाच्या उमेदवारांच्या यादीला ही मंजुरी दिली होती. मात्र, अंतिम क्षणी त्यांनी काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार उभे केले आहेत. आमचा पक्ष वाढत आहे. आमची भूमिका ठाम आहे. शिवसेनेत कोणी आले  किंवा गेले तरी पक्षाला काही फरक पडत नाही. पवार गट नसल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही.  ते म्हणाले, निवडणुकीत काँग्रेसच्या जागा 61 वरून 42 वर आल्या आहेत. राष्ट्रवादीच्या जागा 61 वरून 29 वर आल्या आहेत. तुलनेत  सेनेने गेल्या वेळी केवळ 7 जागा लढविल्या होत्या. यावेळी 51 ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर आणि एक ठिकाणी पुरस्कृत उमेदवार आहे.

भाजपकडून आमच्याकडे सचिन चौगुले, मुग्धा गाडगीळ, राहुल गणेशवाडे आणि राष्ट्रवादीतून माजी नगरसेवक सज्जाद भोकरे हे पदाधिकारी आमच्याकडे आले आहेत. आमच्या पक्षाला महापालिका चालवण्याचा अनुभव आहे. आतापर्यंत सांगलीचा विकास झाला नाही. त्यामुळे विकासाचा वचननामा आम्ही तयार करीत आहोत.  पक्षाच्या प्रचारासाठी वरिष्ठ नेते, मंत्री येथे येणार आहेत. मोठ्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. आमचे सर्व उमेवार सक्षम असल्याने आम्हाला काही अडचण वाटणार नाही. कोणत्याही ठिकाणी आमच्या मैत्रीपूर्ण लढती असणार नाहीत.  

भ्रष्टाचाराला साथ देणार्‍यांना आम्ही नाकारले

प्रा. बानुगडे - पाटील म्हणाले, सर्वच पक्षातील इच्छुक आमच्याकडे उमेदवारीसाठी संपर्कात होते. मात्र, आम्ही भ्रष्ट कारभारास साथ देणार्‍यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. सर्वच ठिकाणी उमेदवार न देता निष्ठावंत आणि सक्षम उमेदवारांना आम्ही न्याय दिला आहे.