Tue, May 21, 2019 04:28होमपेज › Sangli › आ. डॉ. पतंगराव कदम यांची प्रकृती स्थिर 

आ. डॉ. पतंगराव कदम यांची प्रकृती स्थिर 

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:24PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते यांची मुंबईतील लीलावती रुग्णालयात गर्दी होत आहे.

अचानक तब्येत बिघडल्याने  डॉ. कदम यांना पंधरा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  गेल्या आठवड्यापासून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून  त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. उपचारांना डॉ. कदम हे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरच बरे होतील, असे असे डॉ. विश्‍वजित कदम यांनी सांगितले.