Wed, Apr 24, 2019 07:38होमपेज › Sangli › पतंगराव कदम यांना आयसीयूत हलवले

पतंगराव कदम यांना आयसीयूत हलवले

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 05 2018 11:38PMमुंबई : प्रतिनिधी

गेले काही दिवस लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. कदम यांचे मूत्रपिंड काम करत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  कदम यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या आठवड्यात  लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले होते.