Wed, Jul 17, 2019 20:04होमपेज › Sangli › पासपोर्ट सुविधा सोपी करणार : डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे

पासपोर्ट सुविधा सोपी करणार : डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 11:06PMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होण्यासाठी विदेश मंत्रालयातर्फे पाठपुरावा केला. पासपोर्ट  मिळण्याची प्रक्रिया आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्डपेक्षाही सोपी, सुलभ करणार आहे, असे प्रतिपादन विदेश सचिव डॉ.  ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. 

सांगलीतील प्रधान पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. मुळे म्हणाले, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याकामी पुढाकार घेतल्याने आणि मार्गदर्शन केल्याने सांगलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले. येथील मध्यवर्ती पोस्ट कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 164 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सांगलीतील केंद्र हे 165 वे आहे.आता पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ करण्यात आली आहे. यापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी लोक एजंटांची मदत घेत होते. मात्र, आता त्याची काही आवश्यकता नाही. कोणतीही व्यक्ती पासपोर्ट सहजपणे काढू शकते. पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी 14 विविध कागदपत्रे लागत होते. तीही कमी करण्यात आली आहेत, असेही डॉ. मुळे यावेळी म्हणाले.

.परराष्ट्र मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेली ही योजना देशातील संपूर्ण जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असून या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मुळे यांनी केले. नीता केळकर, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी जयंत वैशंपायन, पोस्ट कार्यालयाच्या गोवा विभागाचे अधिकारी डॉ. एन. विनोदकुमार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पुण्याचे जतीन पोटे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पोस्ट कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.