Wed, Jan 23, 2019 04:27होमपेज › Sangli › गाडीतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

गाडीतून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 26 2018 10:32PMतासगाव : प्रतिनिधी 

मिरज - पंढरपूर मार्गावर शिरढोणजवळ खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या गाडीतून पडल्याने तानाजी धोंडीराम किरपेकर (वय 48) (रा. अंजनी, ता. तासगाव) यांचा मृत्यू झाला.

याबाबत  पोलिसांकडून  मिळालेली माहिती अशी : तानाजी किरपेकर हे कामानिमित्त कवठेमहांकाळला चालले होते. शिरढोणमध्ये ते खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या जीप (एम. एच. 10 के. 440) मध्ये बसले. गावापासून थोड्या अंतरावर गाडीचा दरवाजा अचानक उघडल्यामुळे किरपेकर गाडीतून बाहेर रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना मिरज येथील वॉन्लेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, या घटनेची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी अपघातातील गाडी ताब्यात घेतली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.