Fri, Apr 19, 2019 12:10होमपेज › Sangli › पंचायत राजमध्ये कामेरी राज्यात पाचवी

पंचायत राजमध्ये कामेरी राज्यात पाचवी

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 8:30PMयेडेनिपाणी : वार्ताहर

कामेरी (ता. वाळवा) ग्रामपंचायतीचा पंचायत राज सशक्तीकरण अभियानात राज्यात पाचवा क्रमांक आला. त्यांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यापूर्वी राज्यस्तरावरील कमिटीने केलेल्या 100 गुणांच्या मूल्यांकनाचे ग्रामसेवा ट्रस्टच्यावतीने नुकतेच फेरमूल्यांकन करण्यात आले.

ग्रामसेवा कल्याण ट्रस्टचे भाविक पाटील यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय समितीने शनिवार, दि. 17 फेब्रुवारी रोजी कामेरी ग्रामपंचायतीस भेट दिली. त्यानंतर कामेरी-येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेस भेट दिली. तसेच ग्रामपंचायतीचे सर्व दप्‍तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प. शाळा नं. 1, 2, अंगणवाडी, हुतात्मा स्मारक, रमाई घरकुल योजना, दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत केलेली कामे, गाव ओढा स्वच्छता आदी बाबींची पाहणी केली.

यावेळी कामेरी-येडेनिपाणी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष, माजी जि.प. उपाध्यक्ष रणजित पाटील, डॉ. रणजित पाटील, जि.प. सदस्या सुरेखा जाधव, पं.स. सदस्या सविता पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच तानाजी माने, सुनील पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदू पाटील, उद्योजक एम. के. जाधव, विमल पाटील, पोलिसपाटील बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

देशपातळीवरील समांतर मूल्यांकन समितीचे निलेशकुमार घरत, प्रवीण आवळी, परीक्षित बावचकर, गटविकास अधिकारी राहुल गावडे यांनी ग्रामपंचायत व गावातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.  ग्रामसेवक बादशहा नदाफ यांनी प्रास्ताविक केले. ग्रा.पं. सदस्य पोपट कुंभार यांनी आभार मानले.