Wed, Jul 17, 2019 00:32होमपेज › Sangli › पलूस बाजार समितीच्या शिपायाची आत्महत्या 

पलूस बाजार समितीच्या शिपायाची आत्महत्या 

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 11:27PMपलूस : प्रतिनिधी   

पलूस  कृषि  उत्पन्‍न  बाजार  समितीचे  शिपाई  विनायक राजाराम मोकाशी (वय 32,  रा. सांडगेवाडी) यांनी  पेटवून घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी त्यांनी घरी पेटवून घेतले होते. सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये  गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, मोकाशी यांचा मृत्यूपूर्व जबाब पलूस पोलिसांनी नोंदवला आहे. त्यानुसार बाजार समितीचे सचिव गणेश म्हेत्रे व लिपिक शहाजी धुमके (रा. पलूस) या दोघांच्या त्रासाला कंटाळून मोकाशी यांनी पेटवून घेतल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या  मृत्यूपूर्व जबाबानुसार पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.येथील नवीन बसस्थानकासमोर असलेल्या बाजार समितीमध्ये मोकाशी गेली  सहा वर्षे शिपाई म्हणून काम करीत होते. त्यांना कार्यालयातील दोघे जण त्रास देत होते. त्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा गावकर्‍यांचा संशय होता. मोकाशी यांचा मृत्यूपूर्व जबाब घेतल्यानंतर या संशयाला पुष्टी मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.