होमपेज › Sangli › पलूस - कडेगाव पोटनिवडणूक : भाजप कडून संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल 

पलूस-कडेगाव पोटनिवडणूक : संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल 

Published On: May 10 2018 6:53PM | Last Updated: May 10 2018 6:54PMकडेगाव : प्रतिनिधी

पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप कडून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. देशमुख यांनी आज (१० मे)मोठ्या शक्तिप्रदर्शनाने भाजप नेत्यांच्या उपस्थित आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचाही डमी अर्ज दाखल करण्यात आला. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसकडून डॉ. कदम यांचे पुत्र डॉ. विश्‍वजित कदम यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. तर, भाजप कडून संग्रामसिंह देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

संग्रामसिंह देशमुख यांनी सकाळी डोंगराई देवी, वडलाई देवी, देवटकी देवीचेचे दर्शन घेऊन सकाळी 10 वाजता कडेपूर येथून पलूस-कडेगाव मतदार संघातील कार्यकत्यांच्या समवेत "भाजपच्या विजयाचा नारा" देत मोठ्या शक्तिप्रदर्शनाने कडेगाव प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जिल्ह्यातील भाजप नेते खाजदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अजितराव घोरपडे, युवा नेते गोपीचंद पडळकर, बिट्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य मकरंद देशपांडे,  दीपक शिंदे, राजाराम गरुड यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी तसेच पलूस-कडेगाव मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.