Wed, Nov 21, 2018 11:52होमपेज › Sangli › पेड कालवा काम लवकरच सुरू : खा. पाटील

पेड कालवा काम लवकरच सुरू : खा. पाटील

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 7:45PMमांजर्डे : वार्ताहर

पेडच्या डाव्या व उजव्या कालव्यांचे काम दोन महिन्यात सुरू करणार आहे. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस आणि  जलसंपदा मंत्री राम शिंदे यांच्यासोबत बैठक झाली आहे. टेंभू तसेच पंतप्रधान कृषी सिंचनासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी दिली. 

पेड (ता. तासगाव) येथे  पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.  ते  म्हणाले, मोराळे, मांजर्डे, गौरगाव या भागाला  पाणी देणासाठी प्रयत्नशील आहे.  टेंभू योजना पूर्णत्वासाठी 1284 कोटींचा निधी मंजूर आहे. पंतप्रधान कृषी सिंचनासाठी 2000 कोटी निधी मंजूर असल्याने संपूर्ण भाग ओलिताखाली आणण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, जि. प. सदस्य डी. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जि. प. सदस्य प्रमोद शेंडगे, जि.प. चे माजी सदस्य मोहन पाटील, विलास पाटील, सचिन पाटील यांच्यासह कडेगाव, पलूस पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.