Fri, May 24, 2019 02:44होमपेज › Sangli › ‘बुधगाव अभियांत्रिकी’तील ‘टीम ट्रोजन’चे मशीन देशात दुसरे

‘बुधगाव अभियांत्रिकी’तील ‘टीम ट्रोजन’चे मशीन देशात दुसरे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बुधगाव : वार्ताहर

राहुरी महात्मा फुले कृषी ‘तिफन- 2018’ ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाली. या स्पर्धेत देशभरातून 18 संघांनी सहभाग घेतला होता. बुधगाव येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात द्वितीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेचे उद्दिष्ट शेतकर्‍यांना ध्यानात ठेवून स्वयंचलित कांदा काढणी यंत्र बनविणे हे होते. पहिली फेरी पुणे येथे पार पडली. यात देशातून 28 संघ सहभागी झाले होते. 17 संघ दुसर्‍या फेरीसाठी पात्र ठरले. राहुरी येथे दुसर्‍या फेरीत ब्रेक, स्पीड, डिझाईन, चलनक्षमता आदी तांत्रिक बाबी पडताळण्यात आल्या.  ‘टीम ट्रोजन’च्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मशीनने देशात दुसरा क्रमांक मिळविला. एक लाखाचे पारितोषिक,  ट्रॉफी तसेच साधनांचा योग्य वापर व कमीत कमी खर्चात मशीनची बांधणी यासाठी 25 हजार रुपयांचे विशेष पारितोषिक मिळाले. संघप्रमुख स्वराज चव्हाण, नंदिकेश कल्याणी, सुमीत हरगुडे, नागेश पुजारी, सायली पवार, स्नेहा गडदे, तुषार निकम यांच्यासह अन्य विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. अमरसिंह पाटील, प्रा. विशाल पाटील, प्रा. पी. एस. पोळ, प्रा. सी. जी. हारगे, प्रा. एन. व्ही. हरगुडे यांचे त्यांना मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष विशाल पाटील, सचिव आदिनाथ मगदूम, प्रा. पी. एल. रजपूत, प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे, रजिस्टार किरण पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

Tags : Sangli, Sangli news, Padmabhushan Vasantdada Patil College  Engineering, second number,  Tifan 2018, national level competition


  •