होमपेज › Sangli › सरगम ग्रुपच्या बहारदार गाण्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

सरगम ग्रुपच्या बहारदार गाण्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

Published On: May 29 2018 1:32AM | Last Updated: May 28 2018 8:01PMइस्लामपूर : वार्ताहर

दै. पुढारी कस्तुरी क्‍लब व  येथील सरगम ग्रुप हमारा यांच्या विद्यमाने झालेल्या हिंदी व मराठी गाण्यांच्या कार्यक्रमास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.  वरद इंजिनिअर्स, नेक्स्ट फॅशन अ‍ॅपेरियल्स, नाट्यप्रपंच इस्लामपूर यांचे सहकार्य लाभले. 

युवा नेते प्रतीक पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, सरगम ग्रुपचे अ‍ॅडमीन उदय राजमाने, अशोक शिंदे आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन झाले. कस्तुरी क्‍लबची मिसेस कस्तुरीचा मान मिळालेली मनस्वी पवार यांचा प्रतीक पाटील यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.  इस्लामपुरातील संगीतकार, डॉक्टर, इंजिनिअर्स, अ‍ॅडव्होकेट, प्रोफेसर, उद्योजक, व्यापारी, कमर्शिअल आर्टीस्ट या हौशी कलाकारांनी सरगम ग्रुप हमारा हा व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. विजय नांगरे यांनी चला जाता हूँ या गाण्याने सुरूवात केली. ‘नाम गुम जायेगा, यासह हिंदी-मराठी गाण्यांना  कस्तुरी सभासदांनी उत्स्फूर्त दाद दिली. हेमंत पांडे यांनी सादर केलेल्या के पग घुंगरू बांधके या गाण्याला जल्लोषी दाद मिळाली. कस्तुरी क्‍लबने महिलांसाठी अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक, विविध वर्कशॉप, मनोरंजन  आदींसह महिलांच्या सुप्‍तगुणांना वाव देणारे  कार्यक्रम  आयोजित केले आहेत.

वाद्यवृंदामध्ये हेमंत पांडे, महेश जोशी, डॉ. अतुल मोरे, डॉ. विनय राजमाने, डॉ. राहुल नाकील, डॉ. नितीन जाधव, डॉ. निलम पाटील, डॉ. जिज्ञा शहा, वंदना कांबळे, ज्ञानेश्‍वरी पाटील, राजाभाऊ पाटील, सचिन टिकारे, धीरज राजमाने, संतोष हुक्कीरे, दीपक राजमाने, विजय नांगरे, अ‍ॅड. अभिजित परमणे, डॉ. सुजाता डबाणे, दीपक माने, संदीप पाटील, डॉ. राम कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी व उदय राजमाने आदींनी भाग घेतला. संयोजिका मंगल देसावळे यांनी आभार मानले.