होमपेज › Sangli › सांगलीत तिरंगा पदयात्रा

सांगलीत तिरंगा पदयात्रा

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 10:37PMसांगली : प्रतिनिधी

स्वामी विवेकानंद जयंती ते सुभाषचंद्र बोस जयंती दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची आज तिरंगा पदयात्रेने सांगता करण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा देत विद्यार्थी, विद्यार्थिनी पदयात्रेत सहभागी झाले होते. 

अभाविपतर्फे दरवर्षी 12 जानेवारी ते 23 जानेवारी या काळात युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या सप्ताहाच्या सांगतेवेळी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील राममंदिर चौकातून या यात्रेला प्रारंभ करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील चौक, मार्केट यार्डमार्गे पदयात्रा विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात नेण्यात आली. 

तेथे अभाविपचे प्रदेश मंत्री अभिजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाटील यांनी परिषदेची कार्यपध्दती, सध्याची देशातील सामाजिक स्थिती यावर मार्गदर्शन केले. यावेळी सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 

परिषदेचे जिल्हा संयोजक प्रथमेश परूळेकर, महानगर मंत्री प्रवीण जाधव, जिल्हा स्टुडंट डेव्हलपमेंट प्रमुख प्रमोद बेळंकी, विश्रामबाग विभाग मंत्री प्रतीक पाटील, सांगली विभाग मंत्री विशाल जोशी आदींनी संयोजन केले.