Fri, Nov 16, 2018 19:18



होमपेज › Sangli › सांगलीत पुढारी एज्यु-दिशा 2018 प्रदर्शनाचे उद्यापासून आयोजन

सांगलीत पुढारी एज्यु-दिशा 2018 प्रदर्शनाचे उद्यापासून आयोजन

Published On: May 31 2018 1:46AM | Last Updated: May 30 2018 7:58PM



सांगली : प्रतिनिधी

करिअरच्या या महत्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांसह पालकांची अवस्था गोंधळलेली असते. विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी - एज्यु-दिशा 2018’ पॉवर्ड बाय पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पुणे या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन दि. 1 ते 3 जून दरम्यान करण्यात आले आहे. सांगलीमध्ये कच्छी जैन सेवा समाज भवन, सांगली-मिरज रोड  येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या ठिकाणी तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. नामवंत शैक्षणिक संस्थांचा सहभाग राहणार आहे. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक चाटे शिक्षण समूह, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे हे आहेत. पुढारी एज्यु-दिशामुळे विद्यार्थ्यांची उज्ज्वल भवितव्याकडे होणारी वाटचाल अधिक सुकर होणार आहे. 

दहावी-बारावी आणि पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणती शाखा निवडायची, कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, शिक्षणाचे मार्ग कसे निवडावेत, शिक्षणाचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, मेडिकल, इंजिनिअरींगसोबत इतर कोणते शैक्षणिक कोर्सेस आहेत, व्यावसायिक कोर्सेस कोणते, अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे प्रदर्शनात मिळणार आहेत. या प्रदर्शनात विविध नामवंत संस्थाकडील अभ्यासक्रम व त्यातील संधी काय आहेत याची माहिती मिळणार आहे. 

अधिक माहिती आणि स्टॉल बुकिंसाठी 

सनी : 9765566413,  अविनाश : 8805007161 यांच्याशी संपर्क  साधावा.