होमपेज › Sangli › ‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ तर्फे सांगलीत ‘डान्सवर्कशॉप, फॅशन शो’ चे आयोजन

‘पुढारी कस्तुरी क्‍लब’ तर्फे सांगलीत ‘डान्सवर्कशॉप, फॅशन शो’ चे आयोजन

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: May 31 2018 9:56PMसांगली : प्रतिनिधी

दै. पुढारी कस्तुरी क्‍लबतर्फे महिलांच्या आवडीच्या व उपयोगी मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून दि. 4 ते 9 जून या कालावधीत  सांगलीत सहा दिवसीय ‘डान्स वर्कशॉप’ तसेच  ‘फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. 

या वर्कशॉपमध्ये दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्या सभासद व इतर इच्छुक महिला सहभाग घेऊ शकतात. डान्स वर्कशॉपमध्ये महिलांना डान्सचे विविध प्रकार शिकविण्यात येणार आहेत. डान्स वर्कशॉप व फॅशन शोसाठी सर्व महिलांसाठी मोफत प्रवेश आहे.  दि. 9 जूनरोजी कस्तुरी सभासद महिलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी सहभागी होण्यासाठी दै. पुढारी भवन, जिल्हा परिषदेसमोर, सांगली- मिरज रोड, सांगली येथे संपर्क साधावा.      

मोबाईल : 8805007176,   7385816979