Sat, Jul 20, 2019 02:54होमपेज › Sangli › विनाआरक्षण भरतीला मराठ्यांचा विरोध

विनाआरक्षण भरतीला मराठ्यांचा विरोध

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 11 2018 9:01PMआटपाडी : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण लागू करावे आणि मगच 36 हजार पदांची महाभरती करावी. आरक्षणाशिवाय होणारी भरती अन्याय करणारी आहे. ती आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी दिला.आटपाडी तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने वैकुंठ भवनात आयोजित 10 वी 12 वी आणि अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.  विनायकराव गायकवाड, अभिषेक पाटील, आटपाडी तालुकाध्यक्ष बापूसाहेब गिड्डे उपस्थित होते.

महाडिक म्हणाले, दडपण आणून भरती प्रक्रिया राबविल्यास 2019 ला आम्ही पानिपत केल्याशिवाय राहणार नाही. राज्यात 146 मराठा समाजाचे आमदार आहेत. पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांचा काय उपयोग आहे. त्यांना जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. वसंतराव गायकवाड, बळवंत मोरे, डी. एम. पाटील, पोपट पाटील, अशोक देशमुख, प्रा. विश्‍वनाथ जाधव, अ‍ॅड.धनंजय पाटील, शरद पवार, प्रा. संभाजी पाटील, गौरीहर पवार, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. प्रा. विजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.