होमपेज › Sangli › गांजा प्रकरणातील एक संशयित ताब्यात, दुसरा फरार

गांजा प्रकरणातील एक संशयित ताब्यात, दुसरा फरार

Published On: Jun 06 2018 7:55PM | Last Updated: Jun 06 2018 7:55PMजत : प्रतिनिधी 

करजगी (ता. जत) येथील अडीच कोटीच्या अवैध गांजा लागवड प्रकरणातील संशयित महेश उर्फ पिंटू मल्लप्पा पटनशेट्टी (वय २६, रा. करजगी) याला उमदी पोलीसांनी बुधवारी ताब्यात घेतले.  त्याचा भाऊ व गुन्ह्यातील दुसरा संशयित अद्याप पसार आहे. 

करजगी येथे महेश पट्टणशेट्टी व त्याचा भाऊ श्रीशैल यांच्या शेतात पोलीसांनी छापा टाकून १३५० किलो गांजा जप्त केला.  त्याची बाजारातील किंमत अडीच कोटी रूपये आहे. 

पोलीस कारवाईनंतर महेश व श्रीशैल फरार झाले होते. महेश यास कर्नाटक राज्यातील चडचण (ता. इंडी, जि. विजयापूर) येथे उमदी पोलीसांनी शिताफीने अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे व त्याच्या सहकाऱ्यांनी बुधवारी दुपारी ही कारवाई केली.