Wed, Nov 21, 2018 17:57होमपेज › Sangli › विहिरीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

विहिरीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीवाडी येथील एकाने विहिरीतील लोखंडी हुकला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शशिकांत रंगराव पाटील (वय 50) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

शशिकांत पाटील पत्नी, दोन मुलांसमवेत सांगलीवाडीत राहतात. ते शेती करीत होते. त्यांची दोन्ही मुले खासगी कंपनीत काम करतात. मंगळवारी दुपारी ते शेतात काम आहे, असे सांगून घरातून गेले होते. सायंकाळपर्यंत ते परत आले नाहीत. 

घरातल्यांनी शेतात जाऊन पाहिले असता. त्यांनी विहिरीतील लोखंडी हुकला दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत नातेवाईकांनी तातडीने सांगली शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविला. 

उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रात्री उशिरा तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Tags : sangli, One, suicide, Sangliwadi, sangli news