Tue, Feb 19, 2019 08:31होमपेज › Sangli › कुंडलमध्ये टँकरखाली सापडून एक जण ठार

कुंडलमध्ये टँकरखाली सापडून एक जण ठार

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 23 2018 12:08AMकुंडल :  वार्ताहर  

कुंडल (ता. पलूस)  येथे पाण्याचा टँकर उलटल्याने त्या खाली सापडून  ज्ञानदेव लक्ष्मण कोकरे (वय 46,  रा. माळशिरस, जि. सोलापूर) हे चालक जागीच ठार झाले.  कुंडल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी येथे शासनातर्फे पूरसंरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. येथील बायपास  रस्त्यावर  पूरसंरक्षक भिंतीवर टँकर (एमएच09, सीयू  2923) द्वारे  पाणी  मारण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी चालक टँकरमधून भिंतीवर पाणी मारत होता. त्यावेळी समोरून येणार्‍या चारचाकी वाहनास साईड देताना टँकरची मागील दोन चाके गाळात रूतली. त्यामुळे तो पलटी होत असल्याचे लक्षात येताच चालक कोकरे यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवाने तेे टँकर खाली सापडले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक  तपास एस. एस. महाडिक करीत आहेत