Wed, Nov 14, 2018 06:13होमपेज › Sangli › डफळापूरमध्ये एकावर खुनी हल्ला; एक गंभीर

डफळापूरमध्ये एकावर खुनी हल्ला; एक गंभीर

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 23 2018 12:12AMजत : वार्ताहर 

जत तालुक्यातील डफळापूर येथे दोन शेतकर्‍यांमध्ये  झाड तोडल्यावरून वादावादी झाली. यावेळी एकावर कोयत्याने जबरी वार करून खुनी हल्ला केला.  या हल्ल्यात  शंकर पांडुरंग कोरे (वय 55, रा. डफळापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.  हा वार महादेव काळाप्पा परीट याने केला आहे. या घटनेची जत पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  शंकर पांडुरंग कोरे व महादेव काळाप्पा परीट या दोघांचे शेत शेजारी लागून आहेत. या दोघांच्या शेतामध्ये सामाईक बांध आहेत. या बांधावर असलेले झाड शंकर कोरे यांनी तोडले होते. हे  झाड का तोडले आहेस, असा जाब महादेव परीट याने विचारले असता त्यांच्यात जोरात वादावादी झाली. या वादावादीत परीट याने कोयत्याने शंकर कोरे यांच्यावर खुनी हल्ला केला. त्याने कोरे यांच्या डोक्यात, मानेवर, उजव्या हातावर व डाव्या बाजूच्या मांडीवर वार करून गंभीर जखमी केले आहे.

या हल्ल्यात शंकर कोरे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर मिरज येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.