Sat, Feb 16, 2019 16:50होमपेज › Sangli › येलूरजवळील अपघातात अंबपमधील एक ठार

येलूरजवळील अपघातात अंबपमधील एक ठार

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 12:33AMइटकरे : वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येलूर (ता. वाळवा) फाट्यानजीक  दोन मोटारसायकलींच्या अपघातात शामराव तातोबा सोनवले (वय 52, रा. अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी सकाळी झाला. 

सोनवले हे मोटारसायकल (एमएच 09/बीएल-4066) वरून कोल्हापूरच्या दिशेने चालले होते. दरम्यान, रस्त्यानजीकच थांबलेल्या मोटारसायकल  (केए-23/ईबी-3147) ला त्यांच्या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. सोनवले हे गाडीवरून बाजूला रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद कुरळप पोलिस ठाण्यात झाली आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. आजपर्यंत त्यात अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.

Tags : sangli, accident near Yelur, One killed, sangli news,