Tue, Feb 19, 2019 22:21होमपेज › Sangli › नेवरी फाट्याजवळ अपघातात एक ठार 

नेवरी फाट्याजवळ अपघातात एक ठार 

Published On: Jun 28 2018 1:34AM | Last Updated: Jun 28 2018 1:01AMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील नेवरी फाटा येथे विटा-कराड या राष्ट्रीय महामार्गावर   कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या  अपघातात जयदीप राजाराम मुळीक (वय 23, रा. बाबरमाची, ता. कराड) हा तरुण ठार झाला.या अपघाताबाबत कडेगाव पोलिस ठाण्यात  जयवंत विठ्ठल मुळीक (वय 42, रा. बाबरमाची ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. अपघाताची नोंद कडेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. 

जयदीप मुळीक हा पेंटिंगचे काम करीत होता. त्याचे कडेगाव येथे दुकान आहे. मंगळवारी  दुपारी  तो मोटारसायकल (एम.एच.50 ई 1669)ने  नेवरीकडे  जात  होता. अमोल आबाजी जावीर (वय 32, रा. कोळे, ता. सांगोला) हा कार (एम.एच.02 ईयू 1971) चालक भरधाव वेगाने कराडकडे जात होता. मुळीक याच्या मोटारसायकलीस कारने जोरदार धडक दिली.

या अपघातात जयदीप याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला विटा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी तपास करीत आहेत.