Fri, Apr 26, 2019 03:39होमपेज › Sangli › लोणंदजवळ अपघातात एक जण ठार

लोणंदजवळ अपघातात एक जण ठार

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 11:42PMलोणंद : प्रतिनिधी

लोणंद-सातारा रस्त्यावर तांबवे (ता. फलटण) गावच्या हद्दीत भैरवनाथ मंगल कार्यालयाजवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मालट्रकने टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर दोघे जखमी झाले आहे. उमेश बाळासो घोडके (वय 38, रा. बुधगाव, मिरज, जि. सांगली) असे ठार झालेल्याचे नाव आहे. सातारकडून लोणंदकडे येणारा मालट्रक क्रमांकएमपी. 33. एच 4449 याचा चालक मद्य प्राशन करून भरधाव वेगाने जात होता. हा मालट्रक तांबवे गावच्या हद्दीतील भैरवनाथ मंगल कार्यालयाजवळ आला असता लोणंदकडून सातार्‍याकडे निघालेला टेम्पो क्रमांक एम. एच. 09 ईएम 211 चुकीच्या बाजूने जात असताना हा अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक उमेश घोडके हा गंभीर जखमी झाला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात बलराम कुशवाह व क्‍लिनर जखमी झाला आहे.  बलराम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार करत आहेत.