Thu, Sep 20, 2018 02:44



होमपेज › Sangli › एक किलो गांजा जप्त ; दोघांना अटक 

एक किलो गांजा जप्त ; दोघांना अटक 

Published On: Feb 02 2018 1:34AM | Last Updated: Feb 01 2018 11:09PM



मिरज : शहर प्रतिनिधी 

येथील स्टेशन चौकाजवळ असणार्‍या एका बोळात दोघांकडून एक  किलो तीनशे पन्नास गॅ्रम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून हुसेन मैनुद्दीन मुल्ला (वय 42, रा. दर्गा चौक माळी गल्ली, मिरज),  बशीर मोमीन (रा. नादाफ, गल्ली, मिरज) या दोघांना अटक करण्यात आली. विशेष पोलिस पथकाने ही कारवाई केली.

गुरुवारी रात्री 11 वाजता विशेष पोलिस पथक मिरजेत गस्त घालीत असताना स्टेशन चौकात दोघेजण गांजा घेऊन थांबले असल्याचे त्यांना समजले. यावेळी हुसेन व बशीर या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एक किलो तीनशे पन्नास ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.