Fri, Sep 21, 2018 03:39होमपेज › Sangli › एसटी बसमधून पडून एकजण ठार, चालकावर गुन्हा दाखल

एसटी बसमधून पडून एकजण ठार, चालकावर गुन्हा दाखल

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

सांगली-इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथे वळणावर  अचानक ब्रेक मारल्याने एसटी बसमधून खाली पडून एकाचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी शनिवारी बसचालक रावसाहेब बापू पांढरे  यांच्यावर सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत रंजना नाना कांबळे (वय 60, रा. कवठेपिरान) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात नाना बयाजी कांबळे (वय 72, रा. कवठेपिरान) यांचा मृत्यू झाला होता.  कांबळे गुरुवारी सकाळी कवठेपिरान-सांगली बसने सांगलीकडे येत होते. लक्ष्मी फाट्यावरील मंदिराजवळ आल्यानंतर चालकाने जोराने वळण घेतले. त्यानंतर अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सीटवरून उडून कांबळे दरवाजातून रस्त्यावर फेकले गेले. यात ते गंभीर जखमी झाले होते. 

त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags : Sangli, Sangli News ,One fell down,  ST, he dies