Fri, Nov 16, 2018 23:36होमपेज › Sangli › नागावात एकाचा निर्घृण खून

नागावात एकाचा निर्घृण खून

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 19 2018 12:05AMआष्टा : प्रतिनिधी 

नागाव (ता. वाळवा) येथील कृष्णात अण्णासाहेब  शिसाळे (वय 35) यांचा अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने वार करून खून केला. ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैशाली  शिसाळे यांचे ते पती आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्यापही कोणाला अटक केलेली नाही. 

सदरची घटना शनिवारी  सायंकाळी  सात वाजण्याच्या सुमारास नागाव - ढवळी  रोडवर  शिसाळे यांच्या  शेतात  घडली आहे. मारेकर्‍यांने अत्यंत निर्घृणपणे धारधार शस्त्राने कृष्णा यांच्या हातावर, पोटावर, छातीवर वार केले. घाव वर्मी लागल्याने ते ठार झाले.  इस्लामपूर  विभागाचे  उपविभागीय  पोलिस  अधिकारी  किशोर  काळे, आष्टा  पोलिस  स्टेशनचे  पोलिस निरीक्षक शौकत जमादार, सहायक पोलिस  निरीक्षक  अनिल माने व पोलिसांनी घटनास्थळी  भेट  देऊन   घटनेचा पंचनामा केला. कृष्णात शिसाळे  यांचा मृतदेह  शवविच्छेदनासाठी  आष्टा  ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत  आष्टा पोलिस ठाण्यात  फिर्याद  दाखल करून  घेण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या घटनेची  सविस्तर माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांना मारेकर्‍यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. काही जणांची चौकशी केली जात आहे. तसेच खुनाचे कारणही अद्यापही समोर आलेले नाही. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. यामुळे परिसरात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.