Wed, May 22, 2019 20:18होमपेज › Sangli › हात पाय बांधून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लुटले 

हात पाय बांधून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लुटले 

Published On: May 17 2018 5:40PM | Last Updated: May 17 2018 5:40PMकुरळप (जि. सांगली): वार्ताहर

बुधवारी मध्यरात्री तीन ते चार जणांनी  घरात घुसून वृद्ध महिलेचे हात पाय बांधून लाथा बुक्क्यांनी मारहान करून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून सहा तोळे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुशीला आनंदा कांबळे (वय, ७०) यांनी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, कुरळप फाटा लगत सुशिला कांबळे या गेली २५ वर्षापासून  एकट्याच रहातात. मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर त्यांचे घर आहे. बुधवारी मध्यरात्री त्‍यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजा कोणीतरी ठोठावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजा उघडताच चोर आल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यावेळी त्यांनी ओरडतच घराच्या पुढील दरवाजा उघडला व शेजाऱ्यांना हाका मारल्‍या. मात्र, चोरट्यांनी समोरच्या दाराने प्रवेश करून सुशीला यांना लाथा बुक्क्याने मारहाण करून रिव्हॉल्वर, चाकू आणि लोखंडी गजचा धाक दाखवत घरात फरपटत नेले व त्‍यांचे दोन्ही हात आणि पाय बांधून अंगावरील सर्व दागिने काढून घेतले. सुशिला यांनी चोरट्यांना प्रतिकार केल्‍यानंतर त्‍यांनी सुशीला यांना मारहाण केली.  त्‍यांना बांधलेल्या अवस्थेतच ठेवून चोरांनी पोबारा केला.  चोरट्यांनी चार तोळ्याच्या पाटल्या, एक सोन्याची चैन, दोन अंगठ्या, असे १ लाख  ३८ हजार  ५०० रुपयाचे  दागिने चोरून नेले.  

 

Tags : sangli, jewelry. stolen