Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Sangli › दीड लाखांचा गुटखा, तंबाखू जप्त

दीड लाखांचा गुटखा, तंबाखू जप्त

Published On: Feb 10 2018 1:36AM | Last Updated: Feb 09 2018 11:05PMसांगली : प्रतिनिधी

विटा येथील किराणा मालाचे दुकान तसेच तासगाव येथील गोदामावर छापा टाकून 1 लाख 62 हजार रूपयांचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या शाखेने गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. याबाबतचा गुन्हा अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली. 

विटा येथील प्रसाद पेटकर यांच्या वैभव किराणा स्टोअर्स या दुकानात गुटखा तसेच सुगंधी तंबाखूची विक्री केली जात असल्याची माहिती खबर्‍याद्वारे निरीक्षक माने यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पथकाने पेटकर यांच्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी तेथे एक लाख रूपयांचा गुटखा तसेच सुगंधी तंबाखू आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिली. 

तासगाव येथील पंकज सोनी यांच्या गोदामातही अवैधरित्या गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा केल्याचीही माहिती माने यांना मिळाली होती. तेथेही छापा टाकून 62 हजार रूपयांचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. याबाबत पंचनामा करून अन्न व औषध प्रशासनाकडे गुन्हा वर्ग करण्यात आल्याचे निरीक्षक माने यांनी सांगितले. निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, संध्या माळी, महादेव नागणे, राहुल जाधव, शशिकांत जाधव अन्न व औषध विभागाकडील अनिल पवार, दत्तात्रय कोळी, रोहन शहा, स्मिता हिरेमठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.