Tue, Feb 19, 2019 01:54होमपेज › Sangli › सांगली : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

सांगली : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Published On: Feb 08 2018 7:47PM | Last Updated: Feb 08 2018 7:47PMसांगलीः  प्रतिनिधी

येथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. यासीन गौस सनदी(वय ५५, रा. माळी झोपडपट्टी, दक्षिण शिवाजीनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, यासीन यांनी चांदणी चौकातील एका बँकेतून त्यांनी पैसे काढले. त्यानंतर ते त्यांच्या दुचाकी(क्र. एमएच १०, डी ४८९५) वरून गावात  निघाले होते. त्याच वेळी  शासकीय गोदामातील धान्य वाहतूक करणारा ट्रक(क्र. एम.एच ९ एल ४४२०) हा सांगलीकडे येत होता. चौकात आल्यानंतर तो ट्रक काळ्या खणीकडील रस्त्याने जाणार होता. मात्र वाहतूक पोलिसाने या रस्त्यावर काम सुरू असल्याचे सांगितल्यानंतर तो राममिंदरकडे येऊ लागला. समोर चाललेल्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे यासीन हे पुढील चाकाखाली सापडले. अपघातानंतर त्यांना तातडीने येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. श्‍वविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

दरम्यान दरम्यान या अपघाताची नोद येथील विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी अपघातातील ट्रक जप्त केला असून चालकाचा शोध सुरू आहे.