Thu, Mar 21, 2019 15:28होमपेज › Sangli › बसच्या धडकेत वृद्धा ठार

बसच्या धडकेत वृद्धा ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

बसची धडक बसल्याने  राधाबाई पांडुरंग पवार (वय 73, रा. लाळगेगल्ली, खणभाग) ही वृद्धा जागीच ठार झाली. येथील बसस्थानकात सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याची शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी बसचालक रमेश दीपक ढमाळ (वय 35, रा. जुनी रेल्वे लाईन, विजयनगर) यांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी  ः सकाळी बसस्थानकातून सांगली - इचलकरंजी ही बस  बाहेर पडत असतानाच राधाबाई समोरून आल्या. चालक रमेश यांना त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे धक्का बसून पुढील चाकाखाली  सापडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आला.