Fri, Apr 26, 2019 09:21होमपेज › Sangli › ‘ओटीएस’: ६२८३ शेतकर्‍यांना ४ दिवसांची मुदत

‘ओटीएस’: ६२८३ शेतकर्‍यांना ४ दिवसांची मुदत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकरकमी कर्जफेडसाठी (ओटीएस) दीड लाखावरील थकबाकीची रक्कम भरण्यास दि. 31 मार्च 2018 अंतिम मुदत आहेत. पात्र 6283 शेतकर्‍यांनी अद्याप ‘ओटीएस’चा लाभ घेतलेला नाही. त्यांनी दि. 31 मार्चपर्यंत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले. 

‘ओटीएस’साठी बँकेकडील 7 हजार 37 शेतकरी पात्र आहेत. दीड लाखावरील थकबाकीची रक्कम भरल्यास दीड लाखांपर्यंतची रक्कम माफ होणार आहे. आतापर्यंत केवळ 754 शेतकर्‍यांनी 1.50 कोटी रुपये भरून 9.74 कोटी कर्जमाफीचा लाभ मिळविला आहे. उर्वरीत 6283 शेतकर्‍यांनीही ‘ओटीएस’चा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

जिल्हा बँकेने दि. 31 मार्चपर्यंत 5300 कोटी ठेवीचे उद्दीष्ट निश्‍चित केले आहे. त्याची पूर्तता व वसुलीसाठी बँकेच्या सर्व 217 शाखा दि. 29 व 30 मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. 

वेबसाईटचे आज उद्घाटन

जिल्हा बँकेचा 91 वा वर्धापन दिन बुधवारी आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने बँकेच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट सांगली डीसीसी डॉट कॉम या नव्या वेबसाईटचे उद्घाटन बुधवारी सकाळी 10.30 वाजता बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संचालक  व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

जिल्हा बँकेत मंगळवारी कार्यकारी समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. शेती व बिगरशेती 19 कोटी 12 लाख 25 हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. 


  •