Sun, Mar 24, 2019 08:49होमपेज › Sangli › मनपाला बँक खाती सीलची नोटीस

मनपाला बँक खाती सीलची नोटीस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

महापालिकेला 1.60 रुपयांच्या सेवाकर थकबाकीपोटी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने बँक खाती सील करू, असा इशारा देणारी  नोटीस बजावली आहे. सन 2014 पर्यंतची ही सेवाकर थकबाकी आहे. वारंवार नोटिसा बजावूनही तो न भरल्याने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेने या कारवाई विरोधात स्थगितीसाठी मुंबईत लवादाकडे अपिलाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

महापालिकेचे दुकाने गाळे, व्यापारी संकुल, जाहिरीतींचे फलक आदी व्यावसायिक कारणांसाठी सेवाकर आकारला जातो. महापालिकेची गेल्या मार्च 2014 पर्यंत या कराची 80 लाख रुपयांची  थकबाकी होती. यापोटी उत्पादन शुल्कने महापालिका वारंवार नोटिसा बजावरूनही पालिकेने ही थकबाकी भरली नाही. आता या थकबाकीपोटी व्याजासहीत 80 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

आता दंड, व्याज व मूळ रक्कम अशी 1 कोटी 80 लाख रूपये तातडीने भरण्याची उत्पादन शुल्कने महापालिकेला नोटीस बजावली आहे. या नोटिसीनंतर पालिकेने 24 लाख रूपये जमा केले. त्यानंतर दंड व व्याज आकारणीच्या विरोधात मुंबईत लवादाकडे अपील केले आहे. लवादाने महापालिकेची बाजू ऐकून घेत उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईला स्थगिती दिली. पण लावादाने त्यापोटी अंतिम सुनावणी होईपर्यंत 10 लाख रूपये उत्पादन शुल्क विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले. महापालिकेने स्थगिती मिळाल्यानंतर मात्र हे पैसे भरले नाही. त्यामुळे लवादाने कारवाईवरील स्थगिती उठवली. त्यानांतर पुन्हा महापालिकेने 10 लाख रूपये भरले.

वास्तविक गेले वर्षभर उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणी कारवाई केलेली नाही. आता मार्चअखेर  जवळ असल्याने या विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी थकीत सेवाकर वसुलीची मोहीम सुरू केली आहे.

Tags :  sangli news, Municipal Bank Account, seal,  Notice,


  •