होमपेज › Sangli › नोकर नारायण गुड्डीला अटक

नोकर नारायण गुड्डीला अटक

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 11:49PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात राहणारे सी.ए .सुहास देशपांडे यांच्या बंगल्यावर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी त्यांचा नोकर  बॉय) नारायण चन्नाप्पा गुड्डी याला संशयावरून अटक करण्यात आली. त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडे पोलिस कसून चौकशी करीत आहेत. 

देशपांडे यांच्या बंगल्यावर दि. 4 डिसेंबररोजी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता.  दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेला देशपांडे यांचा नोकर गुड्डी याच्या जबाबात पोलिसांना विसंगती आढळून आली आहे. दरोडा पडल्याची माहिती मिळाल्यापासून पोलिस त्याच्याकडे चौकशी करीत होते. प्रत्येकवेळी त्याने दिलेल्या जबाबात विसंगती आढळून येत होती. त्यामुळे शनिवारी पुन्हा त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. रात्री उशिरा अखेर त्याला अटक करण्यात आली.    

दरोडेखोरांनी 25 हजार रोख, सोन्याच्या बांगड्या, हिर्‍यांचा नेकलेस, मंगळसूत्र, कर्णफुले, वेढण यासह गुड्डीचा मोबाईल लंपास केला होता. गुड्डीचा मोबाईलही पोलिसांना सापडला आहे. गुड्डी याच्याकडे कसून चौकशी सुरू असून त्याच्या अन्य साथीदारांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.