Wed, May 22, 2019 20:41होमपेज › Sangli › जि.प. ची एकही शाळा बंद होणार नाही

जि.प. ची एकही शाळा बंद होणार नाही

Published On: Apr 23 2018 1:18AM | Last Updated: Apr 22 2018 8:47PMसांगली : प्रतिनिधी

शासनाने जरी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी सांगली जिल्हा परिषदेकडील एकही शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सांगलीत त्रैवार्षिक 17 वे अधिवेशन झाले. यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्य नेते विश्‍वनाथ मिरजकर होते.

देशमुख म्हणाले, शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. सचिव असिमकुमार गुप्ता यांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका शिक्षकांना बसला आहे. आम्ही सचिवांनाही जाब विचारला आहे. शिक्षकांवर अन्याय होणार नाही. अंशदान पेन्शन योजनेबाबतदेखील  आम्ही  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक घेत आहोत. 

काळोजी बोरसे -पाटील म्हणाले, शिक्षक बदल्यासंदर्भात आदेशामध्ये त्रुटी आहेत.  शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण काम केलेले आहे. त्यामुळे राज्यातील 53 हजार शाळा या डिजिटल झाल्या आहेत.  सातवा वेतन आयोगासंदर्भात दिवाळीपूर्वी निर्णय घ्यावा. विश्‍वनाथ मिरजकर यांनी शिक्षकांच्या बदलीबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा शिक्षकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा  दिला.  जिल्हा परिषदेवर शिक्षण समिती सदस्य म्हणून दोन संघटनांचे प्रतिनिधींना घ्यावयाचे आहे, त्याचाही विचार व्हावा,अशी सूचना केली.  

राज्यध्यक्ष उदय शिंदे, शिवाजीराव साखरे, नाना जोशी, किरणराव गायकवाड आदींनी मनोगत व्यक्‍त केले. शिक्षक बँकेचे अध्यक्ष महादेव माळी उपस्थित होते. अभिनेता अमिर खान यांनी सुरू केलेल्या वॉटर कप योजनेसाठी  1मे रोजी कडेगाव येथे वॉटर कप योजनेसाठी सर्व शिक्षक श्रमदान करतील, असा निर्णय झाला.

अधिवेशनातील महत्त्वाचे ठराव 

27/2 च्या शासन आदेशातील त्रुटी दूर करून बदलीचे धोरण राबवावे,  1 नोव्हेंबर 2005 च्या आदेशानुसार जुनी पेन्शन योजना राबविण्यात यावी.  मोफत गणवेश वाटपात बिगर मागासांचाही समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीचा वापर करावा,  केंद्रस्तरावर ऑनलाईचे काम करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर नेमावा. उच्च माध्यमिक शाळांसाठी शिपाई नेमावा   20 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार शिक्षण समिती सदस्यांची नेमणूक करावी.

शिक्षक समिती नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी

त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवड करण्यात आल्या. महिला आघाडी कार्यकारिणी - जिल्हाध्यक्ष : सुनीता पाटील - चौगुले, कार्याध्यक्ष : शारदा सलगर (वाळवा), उपाध्यक्षा : सुवर्णा ठिगळे (मिरज), कोषाध्यक्षा : नसिमा मुजावर (मिरज), सरचिटणीस : विजया माने (खानापूर). पुरुष आघाडी - जिल्हाध्यक्ष : बाबासाहेब लाड (पलूस), सरचिटणीस : दयानंद मोरे (जत)

Tags : sangli, District Council President, Sangram Singh Deshmukh, No school, closed, sangli news,