Mon, May 20, 2019 20:07होमपेज › Sangli › आघाडीची चर्चा प्रस्तावातच फिस्कटली

आघाडीची चर्चा प्रस्तावातच फिस्कटली

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 27 2018 12:20AMसांगली : प्रतिनिधी

महपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा मंगळवारी प्रस्तावातच फिसकटली. राष्ट्रवादीने 43 जागांची मागणी करीत काँगे्रसला केवळ 33 जागा देऊ केल्या आहेत. दोन जागा अन्य घटक पक्षांसाठी सोडाव्यात, असा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे काँग्रेसनेही त्यांच्यावर कुरघोडी करीत केवळ 20 जागा तुम्हाला देऊ, आम्ही 58 जागा लढणार, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेतो प्रस्ताव धुडकावत फेरप्रस्ताव देण्याची सूचना केली. त्यामुळे आघाडीबाबत दोन्ही बाजूंकडून नाराजीचा सूर  व्यक्त होत आहे. प्रसंगी सूर न जुळल्यास आम्ही स्व:बळावर लढायला तयार आहोत, असा इशारा देण्यात आला आहे.

केंद्र, राज्यात सत्ता असलेल्या भाजपने महापालिका निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार केला आहे. महापालिका क्षेेत्रात भाजपचे खासदार, दोन आमदार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुखही ताकद लावणार आहेत. त्यामुळे भाजपचे हे आव्हान थोपविण्यासाठी महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी काँगेस आणि विरोधक राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढवावी असा आग्रही विचार  पुढे आला आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीच स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यांनी तसा प्रस्ताव खुलेआम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोरही मांडला होता. जयंत पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पृथ्वीराज पाटील, नेत्या जयश्री पाटील यांच्याकडे आघाडीला विलंब करू नका. लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी जयंत पाटील तसेच विधासभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील आणि सर्व नगरसेवकांशी चर्चा करून प्रस्ताव जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्याकडे दिला होता. त्यामध्ये राष्ट्रवादीला 43 जागा द्याव्यात, तर काँग्रेसने 33 जागा लढवाव्यात, अशी मागणी केली होती. 

सोमवारी पृथ्वीराज पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, राजेश नाईक आदिंसह प्रमुख नगरसेवकांची बैठक पार पडली.  काँग्रेसचे विद्यमान 43 नगरसेवक आहेत. असे असताना राष्ट्रवादीकडून जादा जागांची मागणी अवास्तव आहे, असा सूर बैठकीत व्यक्त झाला. उलट राष्ट्रवादीचे  केवळ 18 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना 20 जागाच द्याव्यात. काँग्रेसची ताकद मोठी असल्याने 58 जागा लढवाव्यात, असा बैठकीत निर्णय झाला.

त्यानुसार मंगळवारी पृथ्वीराज पाटील यांनी  जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम युवक काँगे्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. विश्‍वजित कदम,  जयश्री पाटील,  माजी मंत्री प्रतिक पाटील यांनाही त्यासंदर्भातील प्रस्ताव दिला. तोच प्रस्ताव त्यांनी संजय बजाज यांना ई-मेलद्वारे पाठविला. त्यामध्ये ‘राष्ट्रवादीला केवळ 20 जागाच देऊ. काँग्रेस 58 जागा लढेल’, असे कळविले आहे.  मात्र राष्ट्रवादीने तो प्रस्ताव धुडकावत फेरप्रस्तावाची मागणी केली आहे.

प्रत्यक्ष बैठकीद्वारेच चर्चा करू - पृथ्वीराज पाटील

पृथ्वीराज पाटील म्हणाले, राष्ट्रवादीने काँग्रेसला मोठा भाऊ म्हणत अव्वाच्या सव्वा जागा मागणीचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांची ताकद किती, आमची ताकद किती हे जनतेला आणि त्यांनाही माहीत आहे. असे असताना विद्यमान जागांच्या दुपटीपेक्षा जागा मागणे कितपत योग्य आहे? त्यांना आम्ही 20 जागांचा प्रस्ताव देऊ केला आहे. याबाबत  बजाज यांच्याशी चर्चा केली. पण  याबाबत समोरासमोर येऊनच चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

अन्यथा आम्ही स्व:बळावर लढू - संजय बजाज

संजय बजाज म्हणाले,  महापालिकेत राष्ट्रवादीचे विद्यमान 25 नगरसेवक आहेत. काँग्रेसने दिलेला 20 जागांचा प्रस्ताव योग्य नाही. हा प्रस्ताव आम्ही नाकारला आहे. जातीयवादी पक्षाला रोखण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे, आग्रही आहोत. पण याचा अर्थ आम्ही कमजोर आहे असा नाही. काँग्रेसने योग्य तो सुधारीत प्रस्ताव द्यावा, त्यावर चर्चा करू अन्यथा चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. आम्ही स्बवळावर लढण्यास तयार आहे