Thu, Apr 25, 2019 17:32होमपेज › Sangli › बोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत वर्षात एकानेही माहिती नाही कळविली

बोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत वर्षात एकानेही माहिती नाही कळविली

Published On: Mar 13 2018 11:04PM | Last Updated: Mar 13 2018 9:15PMसांगली : प्रतिनिधी

बोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत माहिती कळविणार्‍यास जिल्हा परिषदेने बक्षीस योजना सुरू केलेली आहे. स्त्री भू्रण हत्येची माहिती देणार्‍यास 25 हजार रुपये व बोगस डॉक्टरची माहिती कळविणार्‍यास 1 हजार रुपये बक्षीस योजना आहे. वर्षभरात बोगस डॉक्टर, स्त्रीभ्रूण हत्येबाबत एकानेही माहिती कळविली नाही. त्यामुळे बक्षिसाची तरतूद केलेली रक्कम खर्चाविना पडून आहे. 

म्हैसाळ (ता. मिरज) येथे स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार घडल्यानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जोरदार पडसाद उमटले होते. स्त्रीभ्रूण हत्येबाबतची माहिती कळविणार्‍यास 25 हजार रुपये आणि बोगस डॉक्टरची माहिती देणार्‍यास 1 हजार रुपये बक्षीस योजना जिल्हा परिषदेने स्वीय निधीच्या बजेटमधून सुरू केली. त्यासाठी टोकन तरतूदही करण्यात आली. या योजनेस निधीची कमतरता पडणार नाही. या योजनेस प्रतिसाद द्यावा. बोगस डॉक्टर व स्त्रीभ्रूण हत्याविरोधात जिल्हा परिषदेच्या उपक्रमात लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र वर्षभरात एकानेही माहिती कळविली नाही. जिल्हा परिषदेची ही बक्षीस योजना लाभार्थीविना राहिली आहे.

नोव्हेंबरमध्ये आमदारांकडून लक्षवेध

जिल्हा परिषदेत नोव्हेंबर 2017 मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत ‘दिशा’ समिती सभा झाली होती. आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, सीईओ उपस्थित होते. छुप्या प्रकारे गर्भलिंग निदान सुरू असून मोबाईल व्हॅन पुन्हा कार्यरत झाल्या आहेत. गर्भलिंग निदान करून मोबाईल व्हॅन सीमापार होत असल्याकडे एका आमदारांनी लक्ष वेधले होते. त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार होत असल्यांचा संशय बळावला होता. तरिही एकानेही स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार घडत असल्यबाबतची माहिती शासकीय यंत्रणा अथवा जिल्हा परिषदेला कळविलेली नाही. 

बोगस डॉक्टरविरोधी बक्षीस रक्कम वाढविणार : आरोग्य सभापती रवि जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि म्हणाले, बोगस डॉक्टरबाबत माहिती कळविणार्‍यास 1 हजार रुपये बक्षीस योजना आहे. बक्षीस रक्कम वाढवून ती 5 हजार रुपये केली जाणार आहे.